नयना...
नयना...
नयनात नयन तुझे नयना...
तुझ्या नयनात हरविले
नयन माझे नयना...
तुझे नयन हरणाचे
तिरके नयना...
त्या तिरक्या नयनात
भरलेले काजळ
चिरते काळीज
माझे नयना...
तुझे नयन बोलके
त्यात माझे नयन
डोकावता ते
भ्रमित होतात नयना...
पावसातही तू
भिजताना जगाला नाही
पण मला दिसतात
तुझ्या नयनातील
अश्रू नयना...
तुझ्या नयनातील
प्रेम तेजाळून
अंधारातही प्रकाशते नयना...
तुझे नयनच
माझ्या नयनात
हरविता माझा मी
मला सापडतो नयना...

