STORYMIRROR

Sanjyot Dhavale

Abstract Inspirational

4  

Sanjyot Dhavale

Abstract Inspirational

नववर्षाचा नवा रंग

नववर्षाचा नवा रंग

1 min
11

नववर्ष येते हसत हसत, स्वप्नांना नवे पंख देत,

पहाटेच्या कोवळ्या प्रकाशात, आशा नवी उमलते,

आजचा दिवस सुंदर आहे, ही जाणीव मनात झळकते,

नव्या सुरुवातीची उमेद, मनात अलगद उमलते.


अडचणी येणारच आहेत, हे मन जाणून आहे,

पण त्यांच्याशी लढण्याची ताकदही त्यात आहे,

प्रत्येक अपयशामागे, एक धडा लपलेला,

नववर्ष देतं आपल्याला “आत्मविश्वासाचा नवा झरा”


स्वप्नं मोठी असावीत, पण पावलं छोटी छोटी

दररोज थोडं पुढे जाणं, हीच खरी गोष्ट मोठी,

आजचा प्रयत्न उद्याला, नवा आकार देत असतो

नववर्ष  आपल्या हातात, नवा रंग भरत असतो


Sanjyot Dhavale 

Dombivali 

9372066078 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract