STORYMIRROR

Sanjyot Dhavale

Abstract Fantasy Others

4  

Sanjyot Dhavale

Abstract Fantasy Others

काव्य-प्रतीक्षा

काव्य-प्रतीक्षा

1 min
10

कविता लिहायला  

किती वेळ लागतो?  

शब्द जुळवायला  

किती काळ जातो?  


कविता म्हणजे शब्दांचा खेळ नाही,  

ती भावना असते-  

जशीच्या तशी  

मनावर कोरायची असते.  


लोक म्हणतात "लिही ना काही," त्यांना वाटतं सोपं असतं,

इथे एक एक अक्षर जुळवायला, तासनतास थांबावं लागतं.

कधी लय सापडत नाही, तर कधी अर्थ हरवून जातो,

विचारांचा हा गुंता मग, नुसताच डोक्यात फिरत राहतो.


वेळ लागतोय लागूं दे, घाई करून काय होतं?

हळू हळू जुळलं की, मगच गाणं होतं.

अजून थोडी वाट बघू, शब्द नक्की येतील,

कोऱ्या या कागदावर, मग ओळी हळूच नाचतील.



  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract