नकळत
नकळत
नकळत
तुझ्या माझ्या संवादाला
आमंत्रण मिळावे
नकळतच , मैत्रीचे नाते
प्रेमात फूलावे ....
निशब्द मनाला
तुझ्या निखळ
प्रेमाची साथ मिळावी.
नकळतच , अशांत मनाला
तुझा हात हाती घेऊन
अनोख्या स्पर्शाची ओढ असावी
तुझ्या माझ्या संवादाने
विरहित प्रश्नांनाची उत्तरे मिळावीत
नकळतच , तुझ्या माझ्या
आपुलकीच्या सोबतीने
अविरत आपली प्रेम कहाणी
रोज नव्याने लिहित राहवी

