निवड..
निवड..


गांधीजींची तीन माकडे
शिकवण देती निवडीची
डोळे, कान आणि तोंड
तीन कवाडे ही त्याची
वाईट पाहावे ना कधी
मनिषा हवी चांगल्याची
नजरेस जरी पडता बुरे
हवी तयारी लढण्याची
वाईट ऐकावे ना कधी
ओढ हवी सत्य कथनाची
ऐकलेले मनावर घेण्याआधी
घ्यावी पडताळणी खात्रीची
वाईट बोलावे ना कधी
जिव्हा फुकाची असे जरी
मधुर वाणी, सत्य वचन
बोलण्यात असावी सबुरी