STORYMIRROR

Priti Dabade

Romance Others

3  

Priti Dabade

Romance Others

निरोप

निरोप

1 min
443

होणार होती दुसऱ्याची

तर माझ्यावर प्रेम का केलं

मला सोडून जाताना

तुझं काळीज कसं धजलं


जोडीने पाहिलेल्या स्वप्नांचा 

खेळ अर्ध्यावर सोडून

निरोप घेतला तुझा मी

जड अंतःकरण करून


वेदनेत पाणावले डोळे

आठवणीत भान विसरलो

विरहाच्या विचारात डोळ्यांत 

छबी तुझी साठवत राहिलो


भेट होती आपली

खरंच ती शेवटची

पुसटशी का होईना

आठवण राहील प्रेमाची


निरोप जरी घेतलास 

सुखी तू रहावीस

स्वप्नात तरी मला

रोज तूच दिसावीस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance