निर्णय...
निर्णय...
जसे निर्णय घेता तसे घडता, त्यासाठी घ्यावा निर्णयाचा क्षण,
निर्णयामुळे होते यशाकडे वाटचाल,यामुळे बनते ठाम मन
निर्णय घ्यायला लागतं धाडस, त्यासाठी हवा आत्मविश्र्वास,
निर्णयाशिवाय कृती नसते, लागत नाही कामाचा ध्यास
निर्णय न घेण्यापेक्षा, चुकीचा निर्णय घेणेही चांगले,
चुकलेला निर्णय देतो अनुभव,योग्य निर्णयाने यश बघा धावले
तुमचाही एक निर्णय, बदलवू शकतो तुमचं जग,
कृतिशील निर्णयामुळेच, आयुष्याचा चालवा तुम्ही वग
