STORYMIRROR

Jyoti gosavi

Classics

3  

Jyoti gosavi

Classics

निळा तरंग

निळा तरंग

1 min
221

निळा रंग तो कन्हैयाचा 

 रंगही निळा रामाचा 

आणि प्राशुनी हलाहलाते

 कंठ निळा श्रीहराचा


 निळे निळे बुद्धाचे मुख

 पाहुनी वाटते कौतुक

 अंतर्मन ते होते मुक

 दैवी आहे ऊर्जा ही एक


कधी उतरते धरणी वरती

आकाशाची निळी निळाई

अलगद मूरते सागरात

रंगत जाते निळी झिलाई


कधी वाटते मजला स्वतःच

 व्हावे सानुली नीलपरी

 अलगद मिटूनी घ्यावे  

 निळ्या कमळाच्या अंतरी


कन्हैया च्या भक्ती 

मध्ये रंगते अंतरंग

 आणि पसरती अंगावरती

 निळे निळे दैवी तरंग


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics