STORYMIRROR

Chandarani kusekar

Inspirational

3  

Chandarani kusekar

Inspirational

नातं मैत्रीचं....

नातं मैत्रीचं....

1 min
264

नात्यांचा दरवळ नि नात्यातील हिरवळ,

शांत करते दोन्ही मनांची होरपळ...

नातं,जन्म घेत मनात आणि फुलतंही तिथेच...

फक्त हवा असतो त्याला,एक समान धागा..

एकमेकांविषयी आदर आणि मनात जागा...

निरपेक्ष प्रेम आणि विश्वासाची घट्ट विण...

नको दिखाऊपणा तर हवे सच्चे पण...

आनंदाचा सडा घालून पारिजातकाच्या सुगंधा परी..

योग्य वेळी चपराक देणारी तर योग्य वेळी मिठीत घेणारी..

सुखदुःखाचा सांगाती होतं, ते खरं नात...

जसं फुलाचं सुगंधाशी, तृणांकुराचं दवबिंदूशी..

अन पाण्याचं तरंगाशी....

समजतं त्याला काही न सांगताच,

देऊन टाकतं सारं ते काही न मागताच..

 असं लाभलेलं नात,जपावं प्राणपणाने...

देऊन वेळ,आधार,सोबत नि सहवेदनेने....

मैत्रीचं नातं म्हणजे असतं हककाचं शेअरिंग,

आणि भाव विचारांच्या पाऊलखुणा....

ते असते मनातल्या भावनांना, मुक्तपणे रित करण्याचं ठिकाण...

मैत्री असते नात्यांची न उसवणारी घट्ट वीण..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational