नातं अनोळखीच
नातं अनोळखीच
तु अनोळखी,
मी अनोळखी,
आधी कधी ना पाहिले
मी तुला, ना तु मला....
भेट तर होती ती फक्त एक दिवसाची...
मग एका दिवसात असे काय झाले, की अनोळखीचे नाते जन्मभराचे झाले....
त्या एका दिवसात (...२)
आपल्या दोघांची रेशीमगाठ बांधली गेली.... माझ्या बाबांनी माझे कन्यादान केले
आणि त्या क्षणी अनोळखीचं नातं
जन्मभराचं झालं.....