रातरणीची पहाट
रातरणीची पहाट
रातराणीस जागण्यास भाग पाडे
असे कसे सूर्यदेवता तुझे रूप,
चांदण्यांची चादर ओढून झोपलेले
काळे आभाळही तांबडे व्हावे।
लाल तांबड्या ढगांमधून
दिसता तुझे किरण चार,
झोपेतून जागे होत, किलबिलाट करत
पक्षीही उंच आभाळात विहार करे।
पूर्वी साऱ्या जगाला प्रकाश देण्यास
तुझे रथ जंगल, डोंगर-दऱ्यांमधून धावे,
नव्या जगाच्या या दुनियेत निर्जीव डोंगर
आणि जंगल मात्र काँक्रेटचे झाले।
माणसे बदलली, त्यांचे राहणीमान बदलले
तरी तुझ्यावरची निष्ठा कायम राहिली,
इमारतींच्या गच्चीतून, घराच्या खिडक्यांमधून
तुझे निरागस, प्रेरणादायी रूप डोळ्यात साठवत
दिवसभराच्या घोडदौडीत सारेजण सामील झाले।
