मैत्री आणि तू
मैत्री आणि तू
शाळेमधले पर्व संपता
उभे ठाकले आयुष्य नवे
नव्या दिशांची आस लागता
मित्रांचेही पाठबळ हवे
नव्या वाटा नवे चेहरे
सारे काही अनोळखी ऐसे
नव्या विश्वात रमून जाता
अनामिक असा एक चेहरा दिसे
पुस्तकातल्या प्रश्नाने धरले होते वैर
उत्तराच्या शोधात थबकले तुजपाशी
प्रश्नही सुटले उत्तरेही मिळाली
मिळाला एक सखा
पहिल्या भेटीचा हा अनुभव असा
वाढत्या अभ्यासासोबत
वाढत गेली आपली मैत्री
organic chemistry करता करता
झाले bonding आपलेही strong
आपली ही दोस्ती असे carbon - carbon bond
माझ्या आनंदाचा साक्षीदार
दुःखांवर फुंकर घालणारा
मला पडलेले अनेक प्रश्न सोडवू पाहणारा
मित्रांचे relationship problems समजून घेताना
माझ्या कधीकधी confused कधीकधी sad झालेल्या
या वेड्या मनाचा ताण कमी करणारा
तूच एकुलता एक असा
माझ्या यशाचा आणि अपयशाचा
साक्षीदार आहेस तू
माझ्या वेड्यावाकड्या स्वभावामुळे
माझ्याकडून सतावला गेला आहेस तू
कॉलेजच्या या दोन वर्षात
मैत्रीच्या या मिनाऱ्यावर
बांधले मी दोस्तीचे घरकुल नवे
वाटा कितीही दूर गेल्या तरी
शेवटी पावले ह्याच दिशेने वळे
झालेल्या चूका माफ करत
कर मला पुन्हा आपलेसे
आपुल्यातले हे नाते
जरी दोघांकरिता वेगवेगळे
मैत्रीच्या धाग्याने असेच
एकत्र राहूदेत कायमचे
