पाऊस
पाऊस
पावसाची ही रिमझिम
साद घाली ही मज धून
तार छेडी हे मनाचे
ओठांवर येई स्मित हे......
त्यात मातीचा सुगंध हा
अन थंड गार ही हवा
स्पर्श करून जाई मनाला
शहारून जाई तन मग......
थेंब थेंब हे आले हाती
चिंब चिंब तव सृष्टी भिजली
थंडगार हा वारा येई
अन अंग अंग हे मोहरून जाई.......
टिप टिप या पाऊसधारा
धुंद करी या मज मनाला
अंधुक अंधुक धुक्यातून
हिरवळीक वनराई नटली......
