"न ऋण जन्मदेचे फिटे
"न ऋण जन्मदेचे फिटे
स्पर्ध्येसाठी
(भावगीत रचना)
"न ऋण जन्मदेचे फिटे"
न ऋण जन्मदेचे फिटे कधी माणसा
तू जाण ठेव ही जराशी मोल जाण बा।।धृ।।
बीज अंकुरता उभी गर्भाच्या गाभारी
चाहूल उरी जागे मूर्त रूप साकारी
नाविण्याचे गूज ते उदरात वारसा
तू जाण ठेव ही जराशी मोल जाण बा।।१।।
नऊ मास गर्भात तुझा जीव पोसते
नखभर जीवास जीवात जागवते
मातृत्वाची ओढ जागली तुझ्या स्वरूपा
तू जाण ठेव ही जराशी मोल जाण बा।।२।।
बाळांतकळा दुसरा जन्मच बाईचा
उगी नसे जिव्हाळा जगी थोर आईचा
आईची उपाधी जगी मान कवडसा
तू जाण ठेव ही जराशी मोल जाण बा।।३।।
