STORYMIRROR

koyna jadhav

Tragedy Inspirational

4  

koyna jadhav

Tragedy Inspirational

आई रिटायर्ड होतेय

आई रिटायर्ड होतेय

1 min
573

आई रिटायर्ड होतेय


आई रिटायर्ड होतेय

खरंच का?

कशी हो रिटायर्ड होते ती ?

रिटायर्डमेंटची वयोमर्यादा ?

बर तिची पोस्ट काय ?

बेसिक,महागाई भत्ता, प्रमोशन

हक्काच्या सुट्ट्या मिळतात का ?

आईपणाची पोस्ट

घरकुल नावाच्या कार्यालयात

24 तास रेकटर म्हणून

काम पाहते

आवडी निवडी, दुखणं, खुपण

पै पाहुणे...दारातल्या सडा

रांगोळी ते रात्री लेकरांच्या अंगावर

पांघरून टाकू पर्यंत ओव्हर टाइम करते

एकाला ही भाजी नको

दुसऱ्याला दुसरंच हवं

सकाळचे डबे

इस्त्रीचे कपडे...

काय म्हणून पहात नाही ती

सगळं काही करते

घराच्या चार भिंतीत

जीव ओतून मंदिर बनवते

इतकं सगळं करून

तिला फक्त एकच हवं असतं

प्रेमाचा आदर

तो मिळतो का ? आपण भरमसाट

अपेक्षा करतो

पण ती फक्त निरपेक्ष प्रेम करते

आई नावाची पोस्ट

ही ती पोस्ट आहे जिथे

रिटायर्ड होणे नाही..

पण आपण नको का द्यायला

तिला निवृत्ती वेतन भत्ता

आता हा कसा द्यायचा?

तुमच्या घरकुळात तिचे म्हातारपण फुलू द्या

आनंदाच्या उमाळ्यात नी

समाधानाच्या प्रांगणात.

कारण ती कधीच रिटायर्ड होत नाही...कधीच नाही..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy