STORYMIRROR

Nikita Lanjekar

Tragedy Inspirational

3  

Nikita Lanjekar

Tragedy Inspirational

मुलींनी जगावे तरी कसे?

मुलींनी जगावे तरी कसे?

1 min
667

मनमोकळे समाजात वावरले तर

म्हणतात मुलींना वळणच नाही...

धीर गंभीरपणे समाजात वावरले तर

म्हणतात फेस करण्याची हिंमत नाही...

फॅशनेबल कपडे घातले तर

म्हणतात मुलीवर आई-वडिलांना संस्कार केले नाही...

साधे ड्रेस घातले तर

म्हणतात काय गावठी पोर आहे ...

खूप शिकलेली असेल तर

म्हणतात डोक्यावर मिरे वाटेल...

कमी शिकलेली असेल तर 

म्हणतात अडाणी आहे...

अशा या दुतोंडी दुनियेत

मुलींनी जगावे तरी कसे...?

निरपराधी असताना बदनामीला घाबरून जगावे तरी कसे...?

मुलींनी वागावे तरी कसे...?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy