STORYMIRROR

vaishali vartak

Classics Inspirational Others

4  

vaishali vartak

Classics Inspirational Others

मर्यादा

मर्यादा

1 min
346

हवी मर्यादा जीवनी

वागण्यात बोलण्यात

आणावी ती अंमलात

सुखी होतो जीवनात


रोजच्या जीवनाला

लावा वळण मर्यादेचे

म्हणजे जगण होते 

सदोदित नियोजनाचे 


नदीला असतो काठ

सागरास  तो किनारा

त्यामुळे वसतात नगर

 मिळे मानवास निवारा


दिसे मर्यादा निसर्गात 

म्हणूनच चाले ऋतुचक्र

जरा होता तो असमतोल

निसर्गाची होते दृष्टी वक्र


अशी महती मर्यादेची

ध्यानी ठेवावी जीवनी

ओलांडता रेष मर्यादेची

घडले रामायण भुमनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics