मर्म बंधातली प्रीत
मर्म बंधातली प्रीत
मर्मबंधातली प्रीत
सुखाची ही साजणा
हळूवार फुलवी
या वेड्या मना
गंधाळल्या नभात या
पंख नाजूक भावनांना
तुजसवे सख्या मी
प्रेमात विहरतांना
अलगूज हळूवार
ओठी फुलतांना
बघ शब्द सरींना
बेभान बरसतांना
अबोल प्रीतीची रीत
पिंगा घाली आठवांना
आतूर मन निरागस
साद घाली आसवांना
का जीव अनावर होई
आठवूनी दिवसांना
जाणूनी घे भावना
दे श्वास मम श्वासांना

