STORYMIRROR

Jayshri Jarad

Romance

3  

Jayshri Jarad

Romance

मनाचा संवाद

मनाचा संवाद

1 min
189

 तुझ्याशिवाय जगण्याची 

कल्पनाच नव्हती केली,,

तीच कमनशिबी अवस्था

वाट्याला माझ्या आली,,


मनाचे सगळे तुटलेत बांध,

डोळ्यांना मात्र संततधार,,

जीवनाची चौकट उखडलेली ,,

जगण्याची माझ्या रयाच गेली,,


सांधणार नाही ही जखम ओली,

भळभळुन सतत वाहत राही,

जिवाचं माझ्या झालंय लक्त्तर,,

फाडून फेकून देईल खरंतर,,


नाहीच तुला पण येणार माया,,

तुझ्यावर पडलीय नकोशी छाया,,

भुलला आहेस तू मायाजालात,,

चुकलाय वाट नाहीच दिसत,,

 

फिरून पाहशील जेव्हा तू मागे,,

आठवणींचे उसवलेले धागे,,

धुसरशी झालेली सावली दिसेल,,

सावलीत फक्त माझी ओळख असेल,,!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance