सार जीवनाचे
सार जीवनाचे
1 min
135
तुझ्यासोबत स्वप्न रेखले,,
आयुष्याच्या सोहळ्याचे,,
फुलपाखरासवे उडाले,
दिवस सरले हिंदोळ्याचे,,
मध्यान्ही होरपळलेले,,
सारे क्षण धास्तावल्याचे,,
तेही पतंगासवे जळाले,,
तेज होते मंद दिव्याचे,,
आठव नुसते मनी उरले,,
दोघातल्या गतस्मृतींचे,,
तेही आता वाहून चालले,,
नेत्र भरल्या अश्रूपुरांचे,,
कसे पाहिले क्षण तू सारे
माझ्याशिवाय विहरण्याचे,,
घाव देऊन काय मिळवले?
खेळ नाही सार हे जीवाचे!
