निःश्वास
निःश्वास
शब्दही सुचत नाहीत,,
जेव्हा असते तुझी उणीव,,
भासत नसते आसपास,
तुझी प्रेम भरली जाणीव,,
पाझरतात आसू,,
आपोआप नेत्रातून,,
जशी स्वप्न पाहतात निसटू
माझ्याच हातातून,,
दिसत राहतोस चिडलेला,,
अन मन होत उद्विग्न ,,
शब्द काळजास भिडलेला
अन स्वप्न होतं भग्न,,
कितीही बोललास तरी,,
मन भरेल का रे माझं,,
तुझ्याशिवाय जगणं म्हणजे ,,
मणामणाचं ओझं,,
नाही रे जमत मला,,
हे दुराव्याचं जिणं
पण घेतेच की सावरून
स्वतःस ठेऊन उण,,,
कधी उतरतील स्वप्न सत्यात,,
घेशील मिसळून श्वास,,
येशील परतून तेव्हाच,,
टाकेल मी सुखाचा निःश्वास,,

