पायवाट
पायवाट
1 min
175
विचारांच्या वळणावर चालणारी धूसर पायवाट,
हरवते अधून मधून दाट धुक्यात,
अन वैशाखाच्या धुळीत माखतेही,
गिरक्या घेत भिरभीरते हवेत,
कसलीशी वावटळ होऊन,
आषाढ सरीसह वहाते मग,
डबडबलेले डोळे भरून,
तरीही,
पावलांना आवडतो तिचा सहवास,
विचारांनापण मिळतो ना तेवढाच अवकाश!
मोकळ्या मनाचा स्वतःचाच एकांतवास!
एक एक गुंता सोडवून,
स्वतःच अस्तित्व कोरण्यासाठी,
हवीच असते 'पायवाट'!
