आठवांची गती
आठवांची गती
आठवण साठवांतली
मनात अलगद उतरली
अंकुरलेल्या मनी बघ
कोवळी पालवी फुटली,
कोवळे कोंब प्रीतीचे
उजळून आले वरती,
विसर पडला ग्रीष्माचा
जरी सुगंध पेरून गेला,
आलेल्या वसंताची चाहूल
निराळी होती,
उतरली मावळतीला
ती सांज कोवळी होती,
जग झाले शांत निवांत
तरी जखम ओली होती,
प्रीतीच्या सपनामधली
ती रात्र बावरी होती,
दाटून मनी आठवणींची,
पानगळ सरली ग्रीष्माची,
अन भावविभोर डोळे
शोधती तुझीच प्रीती,
समजून घे रे सजना तू,
तुझ्या आठवाची गती,
एक आस दाटली मनी,
तुझ्या मुखकमलाची,

