मिठी
मिठी
आकाशात चांदण्याला पाहून मन माझं भुललं..
कसं कधी हरपलं भान, माझं मलाच नाही कळलं..
म्हटलं त्याला, मला तुला मिठीत घ्यायचंय..
तुझा शुभ्र, कोमल, शांतता देणारा स्पर्श अनुभवायचाय..
सांग काय करू.. कोणत्या मार्गाने तुझ्यापर्यंत पोहोचू...?
माझे बोलणे ऐकून चांदण्याला हसू आवरेना,
म्हणे किती गं तू वेडी..!
तो स्पर्श अनुभवण्यासाठी इतके कष्ट करायची काय गरज..?
आईच्या प्रेमळ उबदार मिठीत अलगद शिरून बघ..
बाबांच्या स्नेहमय मिठीत जिंकून घे सारं जग..
भावंडांना मिठीत कौतुकाची जादुई पप्पी देऊन बघ..
आलेल्या संकटांना धाडसाने एक झप्पी देऊन जग..
निखळ, निस्वार्थ मैत्रीच्या मिठीत मिळेल शांततेचा वर..
लेकरांच्या लडीवाळ मिठीला चिंब करील ममतेची सर..
पतींच्या लाघवी मिठीत सापडेल सुखाचा स्वर..
नातवंडांच्या कोमल मिठीत मावळेल निराशेचा ज्वर..!
पटल मनापासून सार गुपित चांदण्यान मांडलेल..
अन्...
भानावर आले तेव्हा लेखणीतून माझ्या, चांदणंच कागदावर सांडलेलं...!