मी तुला वेढून घेता
मी तुला वेढून घेता
तू बकुळ फुलांची ओंजळ
श्वासात साठलेली....!
तू रातराणीचा दरवळ
बाहूत गोठलेली......!
मी तुला वेढूनी घेता
श्वासात मोगरा भरतो..!
लक्ष तारांकांमधला
तो चंद्र मजवरी जळतो.
प्रेमाच्या या दिवसाला
मी काय तुला अर्पावे?
मी मूठभर देतो काही
तू आभाळच शिंपावे..!

