मी रुग्णवाहिका
मी रुग्णवाहिका
रक्तबंबाळ लेकरू कूशीत असताना
आई थांबू शकेल का?
कुठल्या तरी आईचा
आधार असतो माझ्या कुशीत
किलबिलणारया पाखरांचा
श्वास असतो माझ्या कुशीत
व्याकूळ कुंकवाचा
आभास असतो माझ्या कुशीत
वेदनांच्या पलीकडे भावनांचा
भार असतो माझ्या कुशीत
माणुसकीच्या बंधातून प्रार्थनेचा
विश्वास असतो माझ्या कुशीत...
मी रुग्णवाहिका,
थांबून चालेल का? ...
