STORYMIRROR

suraj amale

Tragedy

3  

suraj amale

Tragedy

मी पाहिलं होतं

मी पाहिलं होतं

1 min
324

मी पाहिलं होतं

लहानपणी माझ्या गावातील नदीला आलेलं पाणी

मी पाहिलं होतं


त्याच नदीत पोहताना लहान मुलांना

मी पाहिलं होतं


त्याच नदीवर जाऊन धुणं धुतांना

प्रत्येक बाईच्या चेहय्रावरचं हसणं

मी पाहिलं होतं


होय मी पाहिलं होतं

वेळेबरोबर संपत गेलेल्या त्या नदीचं पाणी

मी पाहिलं होतं


टँकरने पाणी आल्यानंतर घाईघाईने

त्यांत पाईप टाकून पाणी भरणाय्रा गावकय्रांना

मी पाहिलं होतं


खिशात पैसे नसतानाही

पिण्यासाठी विकत पाणी घेतांनाचं दुःख

मी पाहिलं होतं


पाऊस पडो न पडो

पण माझ्या शेतात काहीतरी पिकावं म्हणून

कष्ट करणाय्रा प्रत्येक शेतकऱ्यांच्या

त्या घामाच्या थेंबाला

मी पाहिलं होतं


आणि शेवटी पाऊस पडला नाही म्हणून

भेगा पडलेल्या शेतजमिनी पाहून

आत्महत्या करणाय्रा शेतकऱ्यांना

मी पाहिलं होतं

मी पाहिलं होतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy