जाणीव
जाणीव
जाणीव त्या वेळेची जी आपली असावी असं वाटतं
जाणीव त्या क्षणाची जो आपला कधीच होऊ शकत नाही
जाणीव त्या व्यक्तीची जी आपली होऊन पण कधी आपली होत नाही
जाणीव एक पक्षी असून पण न उडता येण्याची
जाणीव त्या प्रत्येक दुःखाची ज्याचा भाग तू नसायला हवं
जाणीव त्या प्रत्येक सुखाची जे फक्त तुझंच होतं
जाणीव त्या ध्येयाची ज्याच्या वाटा तूला खेळवतात
जाणीव तूझ्या अशा आयुष्याची ज्याची तूला कधीच जाण नव्हती
