STORYMIRROR

suraj amale

Others

3  

suraj amale

Others

रंगभूमी

रंगभूमी

1 min
526

प्रत्येक कलाकारासाठी स्वतःचं जग रंगभूमी

प्रत्येक नाट्यगृहासाठी स्वतःचं कार्यक्षेत्र रंगभूमी

तसंच प्रत्येक प्रेक्षकासाठी छोटा पडदा, मोठा पडदा, सिल्व्हर स्क्रीन जुबली स्क्रीन रंगभूमी


एकाच पाञाला असंख्य रूपात दाखवते ती रंगभूमी

तसंच असंख्य पाञांना असंख्य रूपात दाखवते ती रंगभूमी


विंगेच्या कोणत्याही कोपय्रातून पाहताना भिती दाखवणारी रंगभूमी

आणि रंगमंचावर आल्यानंतर स्वतःत सामिल करून घेते ती रंगभूमी


एका कलाकाराच्या रूपाने आकाशी झेप घेणं शिकवते ती रंगभूमी

आणि एका कलाकाराच्याच रूपाने धारातिर्थी पाडते ती रंगभूमी


आजकालच्या खोट्या जगात वास्तविकतेचं दर्शन घडवून

डोळ्यांत पाणी आणते ती रंगभूमी


पडदा उघडल्यानंतर संपूर्ण विश्व वाटावी अशी रंगभूमी

तसंच पडदा पडल्यानंतर अखंड काळोख वाटावी अशी ती रंगभूमी


Rate this content
Log in