मी एकटीच आहे....
मी एकटीच आहे....
काटा रुते कुणाला
आक्रंदतात कोणी
जड़ दुःखभार वाहण्या
मी एकटीच आहे...
डोळ्यात अश्रुधारा
वाहती पुराप्रमाणे
पुसण्या नसे कुणीही
मी एकटीच आहे...
आपुलेच दुःख देती
वैरी हवे कशाला
साहते तरी मुक्याने
मी एकटीच आहे...
हुंकार वादळाचा
गिळला कसाबसा मी
निःशब्द भोग वाहण्या
मी एकटीच आहे..
स्वप्नातल्या कळ्याना
ओवून गुंफ़ीले मी
सुकली फुले वेचण्या
मी एकटीच आहे...
आयुष्य वृक्ष झड़ता
मजला कळे नव्याने
कोणी नसे कुणाचे
मी एकटीच आहे
मी एकटीच आहे....
