STORYMIRROR

Renuka Vyas

Inspirational

3  

Renuka Vyas

Inspirational

आत्महत्या

आत्महत्या

1 min
329

देती जगास ज्ञान, दावी दिशा मनाला

अध्यात्म मार्ग असुनी,का संपवी स्वत:ला.... 


रमती समाजसेवी,किती थोर कार्य भाव

तरी अंतरी एकली,का संपवे स्वत:ला.... 


आयुष्य थोर भासे,भरुनी पुरे जगावे

सांगे कथानके तो,का संपवी स्वत:ला.... 


पाण्यात पोहणाऱ्या,बदका समान शांत

तड़फड़ असे पाऊली,पड़ते मनास भ्रांत... 


रचीली शहांजहाने,ती वास्तू नयनरम्य

थडगेच सत्य आहे,भासे जरी अगम्य... 


मन हे विशाल धरण,व्हा व्यक्त मुक्त भावे

होता अमाप साठा,का बांध ना फुटावे... 


दिसते तसे नसावे,हे सत्य जाण आता

जगण्यावरी प्रेम कर,भरुनी मुळी तत्वतः ... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational