मी एक..
मी एक..
एखाद्याचा कंठ दाटने असते कसे ?
एखाद्याचे हृदय फाटने असते कसे..!
ओसांडूनी प्रीत वाहिली ज्यांची कधी !
त्या प्रेमाचे प्रेम आटने असते कसे..!
शब्दांना फुटतील हुंदके कागदावर
कोणाला ती गझल वाटणे असते कसे..!
कर्णाची हेळसांड, परिक्षा कर्माची
योध्याला खिंडीत गाठने असते कसे..!
आभाळावर मात जो करी स्वबळावरी
त्या पक्षाचे पंख छाटने असते कसे..!
जोडू पाहे एक एका सदा सर्वदा
एकांती 'मी.. एक' वाटने असते कसे..!
आयुष्याचा धडा मिळाला 'रौशन' असा
केसाने हा गळा कापणे असते कसे...!