मी च गांधीजींचा चरखा आहे
मी च गांधीजींचा चरखा आहे
इंग्रजांच्या सत्तेपुढे ढाल बनून उभा आहे,
मी गांधीजींचा चरखा, स्वातंत्र्याचा नवा गाभा आहे.
रखरखत्या उन्हात घामाने मी भिजतोय,
स्वराज्याचं स्वप्न मनात घेऊन मी शिजतोय.
अहिंसेच्या मार्गाने जीवन मी जगतोय,
मी गांधीजींचा चरखा, अन्यायाला मातीत पुरतोय.
अहिंसेच्या माळावरती खंबीर होऊन उभा आहे,
माझ्या प्रत्येक धाग्यात स्वातंत्र्याचा लढा आहे.
हिंसेच्या या आगीवरती शांतीचे पाणी ओततोय,
मी गांधीजींचा चरखा, नव्या युगाला साद घालतोय."
