Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Kalmegh

Inspirational

3  

Varsha Kalmegh

Inspirational

मी... अमिट

मी... अमिट

1 min
476


तू लाख कर प्रयास पण मी मिटणार नाही 

फुलण्यासाठी जन्म माझा, हाय मी मिटणार नाही।। 


राखेतूनी स्वतःच्या मीच उमलणार आहे;

आग लागली म्हणून मी झुलसणार नाही;

हाय मी मिटणार नाही ।।


डुंबूनी स्वतःमध्ये मी तरंगण्यास शिकलो 

समुद्र झाला मित्र आता मी बुडणार नाही;

हाय मी मिटणार नाही।।


अथांग मनामध्येच निर्मिती होते वादळांची भारी

तडाख्याने त्याच्या ही पालवी कोमेजणार नाही;

हाय मी मिटणार नाही।।


कसा मिटवू या 'मी'ला विचार भारी केला 

मग हळुच तो कानात कुजबुजला मी मिटणार नाही ;

मी मिटणार नाही।।


सत्त्वाकडे चालला प्रवास चालला हा तेजाकडे

रज तमाच्या बागुलबुवांना आता मी डरणार नाही;

हाय मी मिटणार नाही।।


Rate this content
Log in

More marathi poem from Varsha Kalmegh

Similar marathi poem from Inspirational