मग्न रहावे
मग्न रहावे
कार्यात मग्न तू रहा घेऊ चला वसा
सारून टाक ते दु:ख नियमित जरा हसा...!!
झेलावया जरी निघालो संकटे जशी
राखून ठेवतो सुखाचा रोज रे पसा....!!
दारात शत्रू आज कोरोना उभा गडे
नाकास मास्क बांध रे दुखेल तुझ घसा...!!
बाहेर काय ठेवले फिरतोस रोज तू
सांगून काय फायदा आता घरी बसा....!!
विश्वास ठेव आज तू स्व कर्तृत्वावरी
उमटून दे तुझ्याच कार्याचा जरा ठसा...!!
आहेस तू हुशार कळले आज रे मला
माणूस देखणा जरी हुशार तू तसा.....!!
द्यावा सदैव हात माणुसकीच शोभते
येवून धाव संकटी तू कृष्ण रे जसा......!!
