STORYMIRROR

Kanchan Thorat

Romance

3  

Kanchan Thorat

Romance

मेहंदीसारखा...!

मेहंदीसारखा...!

1 min
308

गर्द हिरवी मेहंदी ओली,

तसाच तू,

हवाहवासा सुगंध तुझा,

झोंबणारा शहारा!

गर्द हिरव्या मेहंदी चं-

ओलं हिरवंपण,

झिरपतं तसं,

तसं तूही,

झिरपतोस ,रोमारोमात ओला!

हळूहळू रंगवते ती,

माझे केतकी हात,

तसाच तू ही...;

रंगवतोस माझ्या केतकी, तनामनाला!

उमटतोस ...,तनामनावर...!

गडद तपकिरी रंग कोरतोस,

कित्येक आठवणी तुझ्या ...; 

माझ्या मनात-

हिरव्यागर्द मेहंदीसारख्या...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance