मैत्री
मैत्री
मैत्री म्हणजे आयुष्यातील
नसतो दोन शब्दांचा खेळ..
प्रत्येक क्षणी सुखं दुःखात
साथ द्यायची असते वेळ !!
मैत्री म्हणजे रेशीम धाग्याच्या
बांधलेल्या पक्क्या गाठी..
पुर्व जन्माचे ऋणानुबंध,
असावे लागते त्याच्यासाठी !!
मैत्री म्हणजे जुन्या आठवणीं
टिंगटवाळी, नुसत्या गप्पा..
शाळा कॉलेज कट्यावरील
मनसोक्त मारलेला फेरफटका !!
मैत्री म्हणजे वय, जात,धर्म
झुगारून जोडलेल्या वाटा..
आनंदाने उधाण आलेल्या
निळ्या समुद्राच्या लाटा !!
मैत्री म्हणजे सुगंधी मोगरा,
खोडकर नजरा वेगळाच थाट..
सगळी बंधने,मर्यादा झुगरणारी
अल्लडपणा ची अवखळ वाट !!
मैत्री म्हणजे गल्लीचा कोपरा,
नदीकाठी , कुठेही भेट थोडी..
पण फोटो काढून डीपी, स्टेटस
ठेवण्यात निराळीच गोडी !!
मैत्री म्हणजे शब्दरत्नात
न मांडता येणार नात..
विश्वासाने, सुख दुःखात
पाठीशी असलेला हात !!
मैत्री मध्ये कधी जपु नये
कपट, धोका, आणी स्वार्थ..
विश्वासू प्रेम भावना असावी
नात्यांमध्ये अश्रू जावू नये व्यर्थ !!
नशिबवान असते ते ज्यांच्याकडे
असतो मैत्रीचा अनमोल ठेवा..
म्हणुनच की काय देवलापण
वाटतो माझाच हेवा !!
