मैत्री
मैत्री
आयुष्याच्या वळणावर
असे अचानक नाते जुळते,
या नात्याला नाव नसे
पण मित्रत्वाचे दान असते...! १.
कधी-कधी लटके रूसणे
विसरुनी ते पुन्हाची हसती..
दोन ध्रुवावर दोघे असुनी
अभंग राहते त्यांची प्रीती...! २.
जुळती सूर हे अंतरीचे
जणू ऋणानुबंध की गतजन्मीचे..
दयाघना एकच मागणे
सुखी असावे जगणे त्यांचे... ३.
दु:ख तिमिराच्या भयाण रात्री,
अभंग राही अशी मैत्री..
सुवर्णसंधी असते खरी ही
ऊन-पावसातली जणू आधार छत्री...! ४.
वेदना पचविणारी मनस्वी शक्ती,
क्षणांची मुक्ती क्षणभंगुर..
स्नेह,जिव्हाळ्याची चिरंतन भक्ती,
अधरी हास्य खुलवणारी सक्ती...! ५.
भेदभाव अन नसे गरीब-श्रीमंती,
अप्रतिमशी प्रतिमा नेत्री..
मनस्वी अंतरिक नाती-गोती,
जणू स्वच्छ निर्मल शितल क्षेत्री...! ६.
