STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

3  

Meenakshi Kilawat

Romance

" मैत्री प्रेम"

" मैत्री प्रेम"

1 min
415

मैत्री असावी पाण्यासारखी

निर्झर निर्मळ स्फटीकरूपी

जशी हिरवळ बहरावी

अन् आत अत्तराची कुपी!!


प्रेमाची फुले मनामनातून

उधळी जीवन लाटावरी

समृद्ध असो वा दरीद्रहारी

मित्र सखा कृष्णा परी!!


मित्र मिळतो भाग्याने

असावा तो गुणसंपन्न

अभिजात भाष्याने भरी रंग

हास्याने जीवन होई प्रसन्न !!


सुखाच्या श्रावण सरीं सारखी

निर्व्याज प्रेम देतसे माया

धावूनी संकटात दु:खावर

करतो शितल मैत्रीची छाया!!


स्नेह मैत्रीचा जगी आहे

अमुल्य ख्याती परोपरी

मैत्री जागणारा अमोघ झरा

राज्य करीतो काळजावरी!!


हाकेसरशी तगमग होई

जाणिव मैत्रीची क्षणोक्षणी

अखंड त्रिभूवनात नाही

मित्रनाते जगात दुसरे कोणी!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance