मायेचा जोगवा
मायेचा जोगवा
आई तुझ्या मायेचा जोगवा
मिळत राहो आयुष्यभर
तुझ्या गं सा-या भक्तजनांना
युगानुयुगे विठू माऊली
विश्वास देई वारक-यांना १
कुळमाता तुळजाभवानी
जगतजननी अंबामाता
रेणुकामाता माहूरगडा
आम्हा तारीशी भवसागरी
भरून तुझ्या कृपेचा घडा २
रणरागिणी सप्तशृंगी तू
निर्दालन करी कु प्रथांचे
कठीण प्रसंगात दे बळ
समस्तच स्री वर्गाला आज
संपवण्या अत्याचारी खळ ३
