माय
माय
अनाथांची माय म्हणाली होती तू खरं
इथं मेल्यावरचं होतं माणसाच्या जीवनाचा सारं
नाही श्रद्धांजलीच्या लाटेला आज तोटा
का? माणूस गेल्यावरच समाजाला वाटतो मोठा
ओळख होती तुही अनाथांची माय
प्रेमाला पोरक्या असणाऱ्या लेकरांची झाली तू दाय
अनाथांची माय म्हणाली होती तू खरं
तुझं जीवनच होती एक आशा
समाजाला दिली तू नवी दिशा
कोणा पुरस्कारापेक्षा ही केलं तू काम महान
दिखाऊ समाज सुधारकांना नाही याची जाण
होती निराधारांची माय-मावली
हजारों दिशाहीनानां दिली आधाराची सावली
सलाम तुझ्या कर्तुत्वाला आणि अलौकिक कार्याला
अनाथांची माय म्हणाली होती तू खरं
