माय डॅड माय हिरो
माय डॅड माय हिरो
तुफान, पाऊस एकटेच झेलतात,
सर्वांच्या ओठावर हसू मात्र पेरतात,
सूर्यदेवही झाकून घेतो डोळे,
माझे बाबा जेव्हा भर ऊन्हात राबतात
वणवण करताना मोडक्या पायाचा होतो त्यांना त्रास,
व्हावे मी शिकून मोठा हाच असतो त्यांना ध्यास
