STORYMIRROR

Komal Kamble

Abstract

3  

Komal Kamble

Abstract

माणूस

माणूस

1 min
209

माणसा रे माणसा

कधी होशील माणूस!

पशूंसारखे वागून

का एकमेकांशी भांडतो

माणूसच माणसाच्या हातून

माणसाचेेच रक्त सांडतो

मानवतेची ती ओळ

आज पुसली गेली आहे

मानवता आज नश्वरतेच्या   

उंबरठ्यावर आहे

माणसाचा मानवतेशी

आज मेळ बसत नाही

मानवतेच्या मजबूत कड्याचे अस्तित्व

आज प्रबळ राहिले नाही

माणसा रे माणसा

कधी होशील माणूस!

आर्त हाक ही तुझ्या कल्याणासाठी

त्या संतमहात्म्यांंची

ऐक आता तरी

मानवतेच्या उद्धारासाठी!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract