माॅडर्न जग
माॅडर्न जग
जुन्या चालीरिती सोडून
नव्याकडे वाटचाल कर
जुने ते सोने सोडून
नव्याचा स्वीकार कर
कारण जग आता माॅर्डन झालंय
ग्रामीण बोली सोडून आता
शहरी शुद्ध बोली बोल
'व्हत' 'होतेे' करुन
होत्याच नव्हत कर
कारण जग आता माॅर्डन झालंय
जात्यावरच्या ओव्या सोडून
शहरी गाण्यांच्या धुुंदीत बोल
पत्राऐवजी संंदेशाकरिता
फोन, ई-मेलचा वापर कर
कारण जग आता माॅर्डन झालंय
कीर्तनाची साथ सोडून
डीजेवर ताल धर
बैलगाडीचा नाद सोडून
चारचाकीचा छंद कर
कारण जग आता माॅडर्न झालंय
