STORYMIRROR

HARSHDIP MANKAR VISO

Inspirational

3  

HARSHDIP MANKAR VISO

Inspirational

माणूस हरवीला

माणूस हरवीला

1 min
229

माणसा-माणसात चर्चा दिसत नाही, 

गेला प्राण शेजारून पण दुःख होत नाही.

भावनेतून माणसाच्या आपुलकी शब्द मेला,

दुनियेतून माणसाच्या माणूस हरविला.


घासातील घास हा शेजारी देतो होता,

मंगल प्रसंग असता हाक त्यास देत होता. 

मित्र जोही होता शत्रू तोही झाला,

दुनियेतून माणसाच्या माणूस हरविला.


रममाण सर्व हे स्वतःत धुंद झाले,

मिळवून पैसा धन गर्विष्ठ फार झाले.

जिवंत आहे काया तो माणूस वाया गेला, 

दुनियेतून माणसाच्या माणूस हरविला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational