STORYMIRROR

Amrut Birbale

Tragedy Thriller

2  

Amrut Birbale

Tragedy Thriller

*माणुसकीचा मास्क* ...!!!

*माणुसकीचा मास्क* ...!!!

1 min
32

आला आला कोरोना आला ..

संपलेली माणुसकी घेऊन आला..

चेहरा लपवला जात लपवली...

माणूस फक्त उभा राहिला..

पांढऱ्या शुभ्र कपड्या माघी...

फक्तं तो जाळला गेला...

ना हिरवा होता ना केशरी होता..ना तेथे कोणता देवाचा धर्माचा झेंडा होता....

माझा माझा म्हणता ,माझीच माणसे नव्हती...

त्या भयावय परिस्थिती पुढे ना रक्ताचे नाती होती..ना बँकेतील बॅलेन्स होती ....!!

तो फक्त शांत निपचित पडला होता पांढऱ्या वस्त्रा मध्ये ...!

आपला नंबर येताच धगधगते अगणित मुक्त होण्यासाठी...!

ना विधी होती ना पूजा , ना अंत यात्रा होती, ना रडणारे होते...फक्त एक सायरन रुपी पांढरी गाडी अणि होता तो फक्त मानव जातीचा एक माणूस ....!!

काही काळ ओलांडला तोंडावरची झाकण काढली ..

गेला गेला करोना गेला ...

परत वेगवेगळ्या रंगाचे 

झेंडे घेऊन आला...

कधी मंदिरातून देव गेला तर ..

मशिदीत त्याचा अवशेष रुपी सहवास लाभला...!

पुन्हा माणूस हरवला..

अणि वेगवेगळ्या रंगाचा झेंडा फडकला ...

का गेला करोना.?का गेला करोना?....

जिंकला जरी माणूस मास्क लावून विषाणू पासून...

हरला तेव्हा मास्क काढून माणुसकीपासून...!!!!

हरला पुन्हा माणुसकी पासून.....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy