STORYMIRROR

vaishali vartak

Action Classics Children

4  

vaishali vartak

Action Classics Children

माखण चोरी

माखण चोरी

1 min
295

केली पुन्हा माखण चोरी

पडला घट लोण्याचा

मागे फिरुनी पाही कृष्णा

येईल आळ फोडण्याचा


मान मागे वळूनी पहाता

मोरपीस डोईचे झुले

गळ्यातील माळ मोत्याची

पुढे-मागे सहज डुले


काळे कुरळे कुंतल

कानी कुंडले सुंदर 

भाळी चांदनाचा टिळा

रूप शोभे मनोहर


साद देण्या सवंगड्यांना

डोळे मोठे मोठे करुनी

हाताने सावरे बासरी

मनी विचार पळ काढू इथूनी


येतील सारे सवंगडी

दुध लोणी खावया

कुठे राहिला सख्या पेंद्या

वाट पाहतो कन्हैया



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action