माझ्या प्रेमाला स्विकार....
माझ्या प्रेमाला स्विकार....
माझ्या प्रेमाला स्विकार
नको देऊस नकार ।
तुझ्याविना जिने माझे
आहे खरंच बेकार ।।
अहोभाग्य आहे माझे
प्रेम तुजवर झाले ।
नेले चोरून हृदय
नाही मजशी कळाले ।।
ठेव जपून मनाला
सांगू नकोस कुणाला ।
एकमेका प्रेम करू
भुलू अवघ्या जनाला ।।
तूच माझी स्वप्नपरी
तूच आहेस अंतरी ।
जिने तुझ्यासह मज
प्रिये आजन्म धर्तरी ।।
मिटू देत द्वेष सारे
चल राहू संगतीने ।
हरवले देहभान
सखे तुझ्याच प्रितीने ।।

