STORYMIRROR

Ramkrushn Patil

Romance

2  

Ramkrushn Patil

Romance

माझ्या प्रेमाचा खेळ मांडला

माझ्या प्रेमाचा खेळ मांडला

1 min
15K


का गं अशी माझ्या मनाशी खेळलीस

नव्हती द्यायची शेवट पर्यन्त साथ तर

का तू माझ्या मनाच्या घरामध्ये

न पेरलेल्या गावतासारखी उगवलीस

खूप प्रेम केलंय गं तुझ्यावर 

का तुला माझं प्रेम कळलं नाही 

तु तर थाटला गं त्याच्या सोबत संसार

माझा नाही केला तू विचार 

माझ्या शिवाय हा कसा राहणार

तु तर त्याच्या सोबत आहेस आनंदी

मी पण ठरवलंय आज पासून

तुझ्या सोबतच्या त्या काही नाजूक आठवणी

आठवून रोज तुला स्वप्नात बघत जाईन

मी नाही देणार तुला त्रास 

राहा तू तुझ्या सुखी संसारात

माझी तर हीच इच्छा होती

तुझ्या सोबत सुखी संसाराची

फरक फक्त ऐवडाच आहे 

आज तु त्याच्या सोबत संसार मांडलाय

माझा प्रेमाचा तर तु खेळ

असा उघड्यावर मांडलाय...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance