माझ्या बापाच्या
माझ्या बापाच्या
माझ्या बापाच्या !
माझ्या बापाच्या फाटक्या बनीयानीच्या ठिगळात दिसतो मला भारताचा नकाशा !
त्या नकाशातली संघराज्ये घटकराज्ये जिल्हे तालुके अन् गावपातळी वरचे मोहल्ले !
आणि त्यातून दिसते मला उभ्या भारताचे अठराविश्वे दारिद्र्य !
त्या बनीयानीची इतकी दयनीय अवस्था झालीय तरीही ते भारताचे दारिद्र्य
आणि दारिद्रयाची लक्तरे घेऊन दररोज फिरतोय माझा बाप आमच्या कुटुम्बियांच्या उदरनिर्वाहासाठी !
त्याने कितीही झाकण्याचा प्रयत्न केला बनीयानीचे दारिद्र्य
तरीही ते दिसतेच ना !
शेवटी दारिद्र्य ते दारिद्र्यच !
मग ते माझ्या बापाचे असो वा भारताचे !
या दारिद्र्य निर्मुलनासाठी कोणती ना योजना कामी ना अनुदान !
कारण तिथेही दलालांना पर्सेन्टेज !
डिजिटल इंडिया च्या जमान्यात फील गुड अँडव्हान्टेज !
लोक त्याच्या ठिगळाना हसायचे !
पण याच ठिगळातून आम्ही जन्मलोय !
ही हजारो वर्षांची दारिद्र्याची ठिगळ आता आम्हाला नेस्तनाबूत करावी लागतील !
आता या ठिगळाना सांधुन चालणार नाही तर
ती दारिद्रयाची व्यवस्थाच बदलावी लागेल !
आता या दारिद्र्य निर्मुलनासाठी आम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल !
परिवर्तनाची नवी बनीयन माझ्या बापाच्या अंगात परिधान करावी लागेल !
अशी बनीयान
जी कधीच फाटनार नाही !
जी कधीच ठिगळमय होणार नाही !
जी कधीच दारिद्र्यानं करपलीं जाणार नाही !
आनंद दिवाकर चक्रनारायण
